Destination

      पवित्र वाराणसी अयोध्या आणि प्रयागराज ही टुर आपल्या प्राचीन भारताची गाथा सांगणारी एक धार्मिक परिपूर्ण सहल आहे. काशी-गया-प्रयाग ह्या सहलीला पहिल्यापासून खूपच महत्व होते. कारण वाराणसी इथे असलेले एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग ”काशी विश्वेश्वर. अलाहाबाद येथील त्रिवेणी संगम व पिंडदान कार्य. पण आता या सहलीचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून सोबत लखनौ व अयोध्या ही पर्यटनस्थळे झपाट्याने लोकप्रिय होताना दिसत आहेत. मागीलवर्षी  वाराणसी शहराला भेट देणाऱ्यांची संख्या ही ८.५ कोटी होती. पर्यटन जगतातील हा सर्वोच्च उच्चांक आहे.

वाराणसी, प्रयागराज, आणि अयोध्या या यात्रेत भारतीय संस्कृतीचा गाभा दडलेला आहे. काशीच्या गंगेच्या पवित्र घाटांवर होणारी गंगाआरती, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर होणारा स्नान आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दर्शन या यात्रेचा आत्मा आहेत. वाराणसी हे ज्ञान आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू, तर प्रयागराज हे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाने ओळखले जाते. अयोध्येतील राममंदिर आणि शरयू नदीचे किनारे भक्तांना अध्यात्मिक शांती देतात. लखनौच्या नवाबी संस्कृतीने ही यात्रा अधिक रंगतदार बनते. गया, बोधगया आणि सारनाथ यासारख्या स्थळांनी समृद्ध असलेली ही यात्रा ८ ते १० दिवसांत तुम्हाला भारतीय संस्कृतीच्या अनेक पैलूंचा अनुभव देते. धार्मिकता आणि श्रद्धेची अनुभूती मिळवण्यासाठी ही सफर एकदा तरी अनुभवायलाच हवी.

 

इथे नक्की काय काय पाहायचं?

 वारणा व असी या दोन नद्यांनी वेढलेल्या ह्या प्रदेशाला वाराणसी म्हटले जाऊ लागले. हे अतिशय प्राचीन शहर आहे. इ. स. ३२१ पासून या शहराचा उल्लेख आढळतो. हे शहर काशी व बनारस या नावाने पण प्रसिद्ध आहे. शहरात अनके मंदिरे व मशिदी प्रसिद्ध आहेत. वाराणसी मध्ये गंगेच्या काठावर ७ किमी लांबीचे दगडी पायऱ्यांचे विशाल घाट आहेत. मणिकर्णिका तीर्थ घाट हा प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी तिथे आहे. येथील गंगाआरती खूप प्रसिद्ध आहे. बोटीतून गंगाआरती पाहणे हा एक अध्यात्मिक अनुभव प्रत्येकाला मिळतो. वाराणसी हे प्राच्यविद्याचे महापीठ असून येथे गौतम बुद्ध, महावीर, शंकराचार्य, इ. अनेक विद्वानांनी अध्ययन केले. नालंदा व तक्षशिला यांच्याप्रमाणे काशी विद्यापीठ प्रसिद्ध आहे. येथील भरजरी बनारसी शालू जगप्रसिद्ध आहे.

           सारनाथ हे येथून फक्त १० किमी अंतरावर आहे. जिथे भगवान बुद्धांनी आपला पहिला  उपदेश दिला. सारनाथ हे येथील बुद्ध मंदिरे, धमेखा स्तूप, चौखंडी स्तूप व पुरातत्व संग्रालयासाठी सारनाथ प्रसिद्ध आहे.

वाराणसी इतकेच महत्वाचे शहर म्हणजे प्रयागराज. गंगा, यमुना, आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेले आहे. त्रिवेणी संगम हे प्रसिद्ध कुंभमेळ्याचे ठिकाण आहे. जो दर १२ वर्षांनी भरतो.प्रयागराजला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक इतिहास आहे. हे शहर मौर्य, गुप्त, मुघल आणि ब्रिटिश या अनेकांचे साम्राज्यकेंद्र राहीले आहे. अलाहाबाद म्युझियम, आनंदभवन, खुसरोबाग, अशी अनेक ऐतिहासिक वास्तू आणि संग्रहालये या शहरात आहेत. प्रयागराज हे खाद्यप्रेमींचे नंदनवन आहे. येथील अनेक स्थानिक स्वादिष्ट डिशेस प्रसिद्ध आहेत.

           अयोध्येतून वाहणारी शरयू नदी जणू भक्तांच्या विश्वासाची साक्ष देते. नव्याने उभे राहिलेले राम मंदिर अयोध्येतील भक्तांना नवसंजीवनी देत आहे. मंदिराच्या भव्यतेत प्रत्येक भाविकाला श्रद्धेचे अनोखे दर्शन घडते. २२ जानेवारी २०२४ ला नवीन राममंदिर हे भाविकांसाठी खुले करण्यात आले. ते पाहण्यासाठी भाविक प्रचंड प्रमाणात अयोध्या नगरीला भेट देत आहेत. येथील हनुमानगढी, कनकभवन, दशरथ महाल, श्री लक्ष्मण किल्ला, कालेराम मंदिर, रामची पायडी, माणिपर्वत, पंचमुखी महादेव मंदिर ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

           उत्तरप्रदेशच्या गोमती नदीच्या काठावर लखनौ हे शहर  वसलेले आहे. नवाबांचे शहर या टोपणनावाने हे शहर ओळखले जाते. राजे व राण्यांचा रंजक इतिहास या शहरावर आहे. उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या या शहरात अनेक पर्यटन आकर्षण आहेत. उत्कृष्ट हस्तकला, किष्ट कापड, आणि आयकॉनिक चिकनकारी भारतकामासाठी प्रसिद्ध आहे. येथे भेट देण्यासाठी अनेक सर्वोत्तम ठिकाणे आहेत. बड़ा इमामबाड़ा, सिकंदर बाग, लखनौ प्राणी संग्रहालय, हजरतगंज, छत्तर मंझिल, गोमटी रिव्हरफ्रंट पार्क, रुमी दरवाजा ही महत्वाची पर्यटनस्थळे आहेत. खवय्यांसाठी लखनौमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

             वाराणसीला येणारे पर्यटक गया व बोधगया येथे जाऊन येतात. गया हे वाराणसीहून २५० किमी अंतरावर आहे तर गया येथून बोधगया अवघ्या १३ किमी अंतरावर आहे. बोधगया येथील महाबोधी मंदिर, बोधिवृक्ष, चिनी मंदिर, ग्रेट बुद्ध पुतळा, रॉयल भूतान मठ ही प्रसिद्ध  ठिकाणे आहेत. चित्रकूट हे एक सुंदर ठिकाण  प्रयागराज येथून १३ किमी अंतरावर आहे. त्यामुळे या सहलीत चित्रकुटला सुद्धा आपण भेट देऊ शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *