Destination

    इंडोनेशिया हा दक्षिणपूर्व आशियातील एक विविधतापूर्ण आणि महत्वाचा देश आहे. 4 थ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या ह्या देशाचा आकार 1,90,456 चौ किमी आहे. 28 कोटी लोकसंख्या एकंदर 17500 हून अधिक बेत असलेल्या या देशात 6000 हून अधिक बेटांवर लोकवस्ती आहे. जावा, सुमाजा, कालीमंतन, सुलोवसी, न्यू गिनी, सुंदा ही मुख्य बेटे. बाली हे सुंदा बेटसमूहातील एक बेट आहे. जे इंडोनेशियाच्या बाली प्रांतातच 38 प्रांतापैकी एक भाग आहे. बाली प्रांतात व पेनीडा, व लेम्बोगेन, नुसा सेनिगन या लहान बेटांचा समावेश होतो.
    बाली हे बेत जावा बेटाच्या पूर्वेस आणि लोम्बोक बेटाच्या पश्चिमेस आहे. बालीचा इतिहास इसपूर्व 2000 वर्षांपासून आहे. 9 व्या ते 13 व्या शतकात येथे हिंदू व बौद्ध धर्माचा प्रभाव होता. 16 व्या शतकाच्या अखेरीस मुस्लिम धर्माचे प्राबल्य जरी वाढले तरी बाली प्रांतातील हिंदू धर्म मात्र टिकून राहिला. 1906 मध्ये डच राज्यकर्त्यांनी बाली प्रांतावर कब्जा केला. 1945 साली इंडोनेशिया देश त्याबरोबर बाली प्रांत स्वतंत्र झाला. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे तर बालीची राजधानी डेनपासर आहे. येथे इंडोनेशिया, बाली व इंग्रजी भाषा बोलली जाते. बालीची लोकसंख्या सुमारे 50 लाख आहे.  येथील चलन इंडोनेशिया रुपी आहे. भारतीय रु. 500 च्या नोटेत येथे चक्क 1 लाख इंडोनेशियन रुपी मिळतात. त्यामुळे चांगलीच स्वस्ताई आहे. सामान्य माणसाच्या खिशाला सहज परवडणारा हा देश आहे. बालीत उबुड, कुटा, सेमिन्याक, नुसा दुआ ही महत्वाची शहरे आहेत. ‘उबुड’ शहराला बालीचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.

बाली हे जगातील सर्वांत सुंदर बेटांपैकी एक मानल जात. पर्यटनाच्या दृष्टीने सर्वच वयोगटासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. Honeymooners साठी तर पर्वणीच आहे. कुटा बीच, सेमिन्याक बीच, नुसा पेनिडा येथील समुद्रकिनारे नितांत सुंदर आहेत. या देशाला निसर्गाचे जबरदस्त वरदान आहे. माउंट बटुर ज्वालामुखी, Gitage Waterfall, Tegenungan Waterfall, Tegallalang Rice Terraces (भातशेतीचे टेरेस) ही ठिकाणे सुंदर आहेत.  माउंट अगुंग ला बालीचे स्थानिक लोक पवित्र पर्वत मानतात.

इथे नक्की काय काय पाहायचं?

     बाली प्रांतात हिंदूंचे प्राबल्य असल्यामुळे येथे अनेक हिंदु मंदिरे आहेत. देखील शिल्प पाहणे आनंदायी आहे. येथील पारंपारीक नृत्ये, बारोंग नृत्य, केचक नृत्य, टोपेन्ग नृत्यांचा आनंद लुटता येतो. मंदिरात जाताना सरोग (एक वस्त्र) परिधान करावे लागते. तानाह लोट मंदिर, बेसाखी मंदिर, उळवात मंदिर, ही बाली मधील प्रसिद्ध मंदिरे आहेत. क्युनिंगत हा येथील मोठा सण आहे. इथे अनेक योग व मेडीटेशन सेंटर आहे. विशेषतः उबुड भागात. येथे स्पा व मसाज चा आनंद घेता येतो. यथे मांसाहारी सोबत शाकाहारी पदार्थांचे पण उत्तम पर्याय आहेत. नासी गोरेंग (तळलेला भात), मि गोरेंग (तळलेले नूडल्स), साते (मासांचे कबाब), लोळोह हे येथील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहेत.  
    बालीमध्ये अनेक Water Sport Activity एन्जॉय करता येतात. त्यामध्ये बनाना बोट, नेटस्की, पॅरासिलींग सारख्या अनके Activities चा समावेश आहे. बाली मध्ये जगातील सर्वात महाग कॉफी Coffee Luwak मिळते. खरेदीसाठी येथे अनेक गोष्टी आहेत. स्वस्त तर आहेतच पण Bargaining सुद्धा चांगली करता येते. बाली हस्तकला, लाकडी वस्तू, फॅब्रिक, सुगंधित वस्तू, बाली मास्क पेंटिंग (उबुडमध्ये), हर्बल मसाले, Souvenirs उपलब्ध आहेत.
    बालीला मुंबई-पुण्याहून Direct Flight नाही. सिंगापूर, कौलालम्पूर मार्गे वा दिल्ली, बंगलोर मार्गे जाता येते व ती Flight स्वस्त ही असतात. Visa On Arrival असल्यामुळे खूप अगोदर Plan करण्याची गरज नाही. मात्र Flight महाग असल्यामुळे Prebooking करणे नक्कीच चांगले. साधारण 6 ते 7 दिवसात हे एक सुंदर बेट आपण स्वस्तात Explore करू शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *