Destination

      तुम्ही भारताबाहेर एखाद्या वेगळ्या पण सुंदर देशात फिरायला जाण्याच्या विचार करत असाल तर “व्हिएतनाम” हा एक स्वस्त व मस्त देश आहे. दक्षिण आशियातील हा एक निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा देश असून पर्यटकांचे आताच्या घडीचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. या देशाचे क्षेत्रफळ 3,31,212 चौ. किमि असून लोकसंख्या 10 कोटी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत या देशात 85% जनता ही बौद्ध धर्मीय आहे. “व्हिएतनामी” ही ह्या देशाची भाषा आहे. काही ठिकाणी थोडी फार इंग्रजी बोलली जाते. येथील चलन “व्हिएतनामी डाँग” आहे. भारताच्या 500 रुपयाच्या बदल्यात चक्क दीडलाखापेक्षा अधिक चलन उपलब्ध होते.
       व्हिएतनाम चा आकार हा इंग्रजी S अक्षरारखा आहे. दक्षिणेवर पसरलेल्या या देशाला 3200 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हॅनोई ही या देशाची राजधानी असून ती उत्तर भागात आहे, तर हो चि मिन्ह सिटी हि औद्योगिक राजधानी असून ती दक्षिण व्हिएतनाम मध्ये आहे. व्हिएतनामसाठी दिर्घकाळ झुंज देणारे व्हिएतनामचे झुंझार राष्ट्रपुरुष हो चि मिन्ह यांनी 2 सप्टेंबर 1945 साली स्वतंत्रता जाहीर केली. मात्र दक्षिण भाग हा अमेरिकेच्या अधिपत्याखाली होता. व्हिएतनामच्या शूर जनतेने अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राशी गनिमी काव्याने कडवी झुंज दिली. 1957 मध्ये अमेरिकेने सायगाव मधून माघार घेतली. पुढे हो चि मिन्ह यांनी दक्षिण व्हिएतनाम वर हल्ला करून दोन्ही भागांचे एकत्रीकरण केले व 1976 मध्ये Socialist Republic of Vietnam हे अखंड राष्ट्र उदयाला आलं.

हॅनोई हे व्हिएतनाम मधील एक सुंदर शहर आहे. येथे हो चि मिन्ह Mausoleum, Badin Square, West Lake, Tran Quoc Pagoda (6 व्या शतकातील बुद्धमंदिर) Hoan Kiem Lake Turtle Tower ही ठिकाणे पाहता येतात. पण हॅनोईच्या old quarter भागातील वॉकिंग टूर करताना खूपच मज्जा येते. तेथील लोकसंस्कृती जवळून पहा येते. ट्रेन पास होण्यातला अनुभव एकदम हटके आहे. येथील पपेट शो पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. हॅनोई पासून जवळचे हॉलोन्ग बे हे UNESCO WORLD HERITAGE आहे. येथील क्रूझवर राहणे व तेथील धमाल, Sunrise व छोट्या बोटींमध्ये केलेली सफर ज्यात Limestone, Rocks, Grotto (कार्व्हस) ही खूप रोमांचकारक असते. इथे Kayaking, Fishing, Swimming चा आनंद लुटता येतो.

इथे नक्की काय काय पाहायचं?

      दानांग हे व्हिएतनाम मधील एक स्वच्छ आकर्षक शहर आहे. निसर्ग, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळ आणि आधुनिकतेचा सुंदर संगम या शहरात पाहावयास मिळतो. Non-Nous Village, Marble Mountains, Cham Museum, My Khe Beach ही सर्व प्रेक्षणीय स्थळं पाहता येतात. पण येथील बन्ना हिल्स ला केबल कार ने जाण्याचा अनुभव खूपच रोमांचक आहे. Golden Bridge (हाताच्या आधारावरचा पूल) Fantasy Park, French Village, Linh Ung Pagoda ही पर्यटन स्थळे पाहता येतात.
      हो चि मिन्ह सिटी हे 89 लाख लोकसंख्या असलेले एक भव्य शहर आहे. ह्या शहराचे पूर्वीचे नाव हे सायगाव. येथे Reunification palace, Central post office, Notre Dame – Cathedral, War Remnants Museum (युध्यातील अनेक गोष्टींचे संग्रहालय) पाहता येतात. चू ची टनल, येथे अमेरिका युद्धातील बंकर पाहता येतात. मी कॉंग डेल्टा टूर मध्ये बोटींग, हनी टेस्टिंग, कोकोनट कँडी फॅक्टरी ला भेट देता येते. विनह ट्रॅन्ग पगोडा बरोबरच साऊथ व्हिएतनाम लोकनृत्याचा आस्वाद घेता येतो.
      व्हिएतनाम हा जगातील सर्वात जास्त काळ्या मिरीचे उत्पादन करणारा देश आहे. कॉफी उत्पादनामध्ये ब्राझील नंतर व्हिएतनाम चा दुसरा क्रमांक लागतो. या देशाला मोटर बाइक्स चा देश म्हणतात. लोकसंख्येच्या ११०% बाइक्स व्हिएतनाम मध्ये आहेत. येथे ड्रॅगन ची पूजा केली जाते तर कासवाला पवित्र मानले जाते. फुटबॉल हा येथील राष्टीय खेळ आहे. येथे १२ फेब्रुवाली ला नवीन वर्ष साजरे केले जाते व तो एक मोठा सण असतो. ओ दाई हा त्यांचा पारंपरिक पेहराव विशेष प्रसंगी परिधान केला जातो. व्हिएतनाममध्ये एक अनोखा सण आहे ज्याला ‘लव्ह मार्केट’ किंवा ‘खाऊ वै लव्ह मार्केट’ म्हणतात. हा सण व्हिएतनामच्या डोंगराळ भागात, विशेषतः हा Giang प्रांतातील Meo Vac जिल्ह्यात आयोजित केला जातो. हा एक सांस्कृतिक उत्सव आहे जिथे वेगवेगळ्या वांशिक समुदायातील लोक त्यांच्या प्रेमसंबंधांसाठी आणि साथीदारांसाठी भेटतात. अंड्यातील पिवळ बलक वापरून बनवलेली कॉफी तसेच स्नेक वाईन प्रसिद्ध आहे.
     फो नूडल्स सूप, स्प्रिंग रोल्स, बान्ह मी, चिकट तांदूळ, सीफुड हे व्हिएतनामचे मुख्य पदार्थ आहेत. भारतीय खाद्यपदार्थ सुद्धा बऱ्यापैकी मिळतात. खरेदीसाठी कपडे, हस्तकला, लामणदिवे, मसाले, हाताने विणलेले कपडे, ब्युटिक शॉप्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू प्रसिद्ध आहेत. व्हिएतनामला जायचा उत्तम सीझन ऑक्टोबर ते एप्रिल आहे. इ व्हिसा असल्यामुळे ह्या देशाला भेट देणे खूपच सोपे आहे. झुंजार वृत्तीच्या अमेरिकेला नमविणाऱ्या या देशाला प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *